पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राज ठाकरेंच्या मोदीविरोधी भूमिकेचा आम्हाला उपयोग झालाय'

बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतली

लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा विरोधकांना उपयोग झाला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर छोटे राजकीय पक्ष मिळून राज्यात पुढील सरकार स्थापन करतील, असा विश्वासही व्यक्त केला. 

राष्ट्रवादीचे आणखी चार आमदार भाजप-शिवसेनेच्या वाटेवर

'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडी करण्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा केल्यावर पक्षश्रेष्ठीच हा निर्णय घेतील. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दलची त्यांची भूमिका बदलली आहे, हे वास्तव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्याबद्दल सांगताना बाळासाहेब थोरात म्हणाले, दोन्ही नेत्यांमध्ये भेट घडवून आणण्यामागे कोणाचे प्रयत्न होते, हे मला माहिती नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले होते. प्रचारावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे मतदारांनाही भावले होते. अर्थात त्याचे मतांमध्ये रुपांतर झाले नाही, हा वेगळा मुद्दा आहे. त्यामागील कारणेही वेगळी आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणांचा आम्हाला उपयोग झाला, याबद्दल कोणाचेच दुमत नाही.

काँग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना विमानळावरुन अटक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, असे सांगून ते म्हणाले, शेती क्षेत्रापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यावर उपाय योजण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गेल्या दिवाळीपासून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीची अपेक्षा करीत असताना त्यांना एप्रिलमध्ये मदत देण्यात आली. सरकार फक्त जाहिरातबाजी करण्यात आणि मोठी मोठी आश्वासने देण्यातच रमले आहे. येत्या तीन महिन्यांत युती सरकारचा पर्दाफाश करण्याचे आम्ही ठरविले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नसले, तरी विधानसभा निवडणुकीत आमच्या जागा नक्की वाढतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Assembly Election 2019 Raj Thackerays anti Modi stand helped Opposition says Balasaheb Thorat