राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांच्या साह्याने घ्यावी, अशी मागणी केली आहे. लोकांचा मतदान प्रक्रियेवरील विश्वास टिकून राहावा, यासाठी मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे आणखी चार आमदार भाजप-शिवसेनेच्या वाटेवर
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करीत नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक रद्द ठरवावी, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतपत्रिकांच्या साह्याने निवडणुका घेण्याकडे वळले पाहिजे. त्यामुळे मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहिल. अनेक मतदारांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दल शंका आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्याकडे वळले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'राज ठाकरेंच्या मोदीविरोधी भूमिकेचा आम्हाला उपयोग झालाय'
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या साह्याने मतदान घेताना प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मोजले गेलेले मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत निवडणूक अधिकाऱ्याने निकाल जाहीर केला नाही पाहिजे. हा विषय निवडणूक आयोगाकडे हस्तांतरित केला पाहिजे. निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकराचा अभ्यास करून मगच निकाल दिला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही, याकडेही प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले.