पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महापूरः विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी

राज ठाकरे

कोल्हापूर, सांगलीमधील पूरस्थिती गंभीर आहे. दोन-तीन दिवसांत तेथील पाणी ओसरेल. पण त्यामुळे रोगराई सुरु होईल. माणसांना स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार आहे. आक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होईल. मग सरकार मदत करता येणार नाही म्हणून हातवर करेल. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकला. पुढच्या वर्षी निवडणुका घ्या, अशी आग्रही मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. 

सगळं आधीच ठरलं असेल तर निवडणूक लढवायचीच कशाला - राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना माज आला आहे. पूरस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही आधीच लष्कराच्या ताब्यात हा भाग द्यायला हवा होता. पण हे सर्व नेते यात्रांमध्ये गुंग होते. राजकारण एके राजकारण करत आहेत. पक्षप्रवेश करत बसायचे. ही परिस्थिती लगेच आटोक्यात येणार नाही. सहा महिने यासाठी लागतील. पाणी ओसरेल. पण रोगराई पसरेल.

मध्य आणि पश्चिम रेल्वे लाईफ जॅकेट्स, बोटी खरेदी करणार; कशासाठी माहितीये?

सध्या कोल्हापूर, सांगलीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. निवडणुका पुढच्या वर्षी घ्या असे ते म्हणाले. अनेक ठिकाणी पाऊस नाही. दुष्काळी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पाऊस नाही पण पूर आला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. मी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करणार आहे. आधी महाराष्ट्र स्थिर होऊ द्या, असेही ते म्हणाले. यांचे निवडणुकीचे आकडे ठरलेले आहेत. कुठल्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फिरताय का, असा सवाल करत यंत्रणाच नाही त्यांच्याकडे. यांना कशाशी देणेघेणे नाही, असे त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Assembly election 2019 postpone Assembly Elections for flood situation in kolhapur sangli demanded by Mns Chief Raj Thackeray