पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाजनादेश यात्रेला काँग्रेसचे पोलखोल यात्रेने उत्तर, नाना पटोले करणार नेतृत्त्व

काँग्रेस नेते नाना पटोले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून पोलखोल यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या २० ऑगस्टपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसकडून पोलखोल यात्रा सुरू करण्यात येणार आहे.

राजीव गांधी यांच्या जयंतीला ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे. विदर्भातील मोजारीपासून यात्रेचा प्रारंभ होणार असल्याचे माजी खासदार आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारसमितीचे प्रमुख नाना पटोले यांनी सांगितले. 

काश्मिरवर सुरक्षा परिषदेत बंद दरवाजाआड चर्चा

१ ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला होता. राज्यात गेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीपेक्षा आपल्या सरकारने दुप्पट विकासकामे केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. गेल्या पाच वर्षांत राज्यात कोणती विकासकामे झाली, यावर ही चर्चा घेण्याचे आव्हान त्यांनी दिले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्त्वाची मागणी आपण फारशी गंभीरपणे घेत नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या मागणीची खिल्ली उडविली होती.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

नाना पटोले म्हणाले, राज्यातील बेरोजगारी, शेतीच्या समस्या, पायाभूत सुविधा यांची स्थिती अजून जास्त खराब झाली आहे. गेल्या तीन वर्षांतील आर्थिक सर्वेक्षण अहवालातूनही विकासदर घटल्याचेच सांगितले जात आहे. राज्यातील युती सरकारने दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावला आहे. या माध्यमातून मध्यमवर्गीयांकडून महिन्याला ३५० कोटी रुपये गोळा केले जात आहेत. आम्ही याचा पर्दाफाश करणार आहोत.