पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील जास्त जागांवर राष्ट्रवादीचा डोळा, काँग्रेसची भूमिका निर्णायक

शरद पवार

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील जागावाटपावरून यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लवकर एकमत होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. मुंबईमध्ये विधानसभेच्या ३६ जागा आहेत. आतापर्यंत त्यापैकी जास्त जागा काँग्रेसच लढवित आलेला आहे. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये समसमान किंवा किमान १२ जागांची मागणी केल्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करताना कार्यकर्त्यांना शहरी भागांतील जागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील जागांकडेही अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत एकतर आम्हाला मुंबईत काँग्रेस इतक्याच जागा मिळाल्या पाहिजेत किंवा किमान १२ जागा आमच्यासाठी सोडल्या गेल्या पाहिजेत. 

राज्य सरकारचा पवारांना धक्का, नीरेचे पाणी उजव्या कालव्यात सोडणार

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस फक्त सात जागांवर लढला होता. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले होते. 

या संदर्भात काँग्रेसचे राज्यातील प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप बोलणी झालेली नाहीत. मुंबईतील जागांसंदर्भात जे काही सांगितले जात आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी जिल्हास्तरावर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांनी कोकण, मुंबई, ठाणे, कल्याण या भागाच्या बैठका घेतल्या.

वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते?

मुंबईत पक्षाने काँग्रेसकडून १२ ते १५ जागांची मागणी करावी किंवा प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघाची मागणी करावी, असे सचिन अहिर यांनी बैठकीत सांगितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.