पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. येत्या शुक्रवारी, १३ सप्टेंबर रोजी भास्कर जाधव आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वतः भास्कर जाधव यांनीच सोमवारी माध्यमांना ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगूनच आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्थिती चिंताजनक, विक्रीत १९९८ नंतरची मोठी घसरण
जिल्हा परिषदेचे नऊ सदस्य आणि ७३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून, या दोन्ही पक्षांचे नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहेत. येत्या काही दिवसांतही काही नेते भाजप किंवा शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यात आता भास्कर जाधव शिवसेनेत येणार असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.
स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी आनंदाची बातमी!
कोकणातील आणखी एक नेते अवधूत तटकरे यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.