पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीसाठी मनसेला आघाडीत सामावून घेण्यात येणार नाही, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांना ३८ जागा सो़डण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी आघाडीत मनसेला सामावून घेण्यात येणार नसल्याचे काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

RSS प्रमुख मोहन भागवत पहिल्यांदाच विदेशी माध्यमांशी साधणार संवाद

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात भाजपविरोधी प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आंदोलन छेडण्याच्या उद्देशाने राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणुक आयुक्तांची भेटही घेतली होती.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होण्याची शक्यता

दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची घेतलेली भेट चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. या सर्व घडामोडीनंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनसेही मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काँग्रेसकडून या चर्चेला तूर्तास पूर्णविराम देण्यात आला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 mns not included congress ncp aghadi says eknath gaikwad