पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

५ वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था 'नामुमकीन'

मनमोहन सिंग

मोदी है तो मुमकीन है! असा नारा देत विक्रमी मताधिक्याने सत्तेत आलेल्या भाजपच्या आर्थिक नियोजनावर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी तोफ डागली आहे. आगामी ५ वर्षात मोदी सरकारने ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. पण पाच वर्षात हा पल्ला गाठणे अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

ते म्हणाले की, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी प्रत्येक वर्षी १० ते १२ टक्के इतका विकास दर अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या घडीला विकासदर दिवसेंदिवस घसरतानाचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने देखील यंदाच्या वर्षी विकास दर ६.१ टक्क्यांपर्यंत पोहचेल, असे म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी दिला. व्यापाऱ्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करुन देण्याच्या समर्थन करायला हवे. पण मागणीमधील घट भरुन काढण्यासाठी अप्रत्यक्ष करात कपात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कोलमडलेली अर्थव्यवस्था हिच देशातील वाढत्या बरोजगाराचे मुख्य कारण असल्याचेही ते म्हणाले.  

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी त्यांनी  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. पीएमसी बँकेप्रकरणात जो प्रकार घडला तो दुर्देवी आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, अर्थमंत्री यांनी याप्रकरणात लक्ष घालून १५ लाख खातेधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 manmohan singh target modi government on 5 trillion economy and pmc bank scam