पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले पाच उमेदवार कोण माहितीये?

पुण्यात मतमोजणी सुरु

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला असला, तरी भाजपला एकहाती सत्ता मिळवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. राज्यात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आता सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटी होणार आहेत. पण या निवडणुकीत अनेक लक्षवेधी लढती झाल्या. अनेक ठिकाणी शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार लढत झाल्याचे पाहायला मिळाले. काही उमेदवार खूप कमी मताधिक्याने निवडून आले आहेत. कमी मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार कोणते आणि त्यांचे मताधिक्य किती होते, याचा घेतलेला आढावा...

हरियाणातील फॉर्म्युल्यानंतर शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' आणखी वाढली

१. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे अवघ्या ४०९ मताधिक्याने निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले हे उमेदवार आहेत.

२. विदर्भातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन हे अवघ्या ७१८ मतांनी विजयी झाले आहेत. 

३. पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातून भाजप-रासपचे उमेदवार राहुल कुल हे अवघ्या ७४६ मतांनी निवडून आले आहेत. 

DIWALI 2019: म्हणून लक्ष्मी पूजनासाठी साळीच्या लाह्या आवश्यक

४. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे केवळ ७६८ मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून त्यांनी शेकापचे अनिकेत देशमुख यांचा पराभव केला. 

५.  नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे हे अवघ्या ८२२ मतांनी निवडून आले आहेत.