पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमच्या पक्षातील जुन्यांची काळजी करू नका, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

चित्रा वाघ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला

आमच्या पक्षातील जुन्या नेत्यांची काळजी करू नका. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांपैकी केवळ राधाकृष्ण विखे-पाटील हेच बाहेरून आलेले आहेत. त्यांचाही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. उर्वरित सर्व मंत्री हे भाजपमध्येच विविध पदांवर काम केलेले आहेत, याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी लक्ष वेधले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार मावळत्या आमदारांनी आणि इतरही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकार व बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात, विजय मल्ल्यांचे ट्विट

काँग्रेसचे मावळते आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला.

बीकेसी ते वाकड फक्त २३ मिनिटांत, हायपरलूप प्रकल्प सहा वर्षांत साकारणार

चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाची भीती दाखवून नेत्यांना पक्षात घेतले जात आहे, असा आरोप केला जात आहे. पण हा आरोप करणाऱ्यांनी मागे वळून पाहिले पाहिजे. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना पक्षात घेतले. त्यावेळी काय स्थिती होती. तुम्ही जे कराल ते योग्य आणि पक्षहिताचे होते आणि आम्ही जे करतोय ते भीती दाखवून असे म्हणणे योग्य नाही. ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे काम मिळेल. आपापल्या भागात चांगले काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांना पक्षात घेतले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 dont worry about old leaders in bjp says chandrakant patil