पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज युतीची घोषणा करणार ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजप-शिवसेनेची विधानसभा निवडणुकीसाठी युतीची मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करु शकतात, असे बोलले जात आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भातील महत्त्वाच्या चर्चेसाठी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याचेही सांगण्यात येते.

मुख्यमंत्रीसाहेब खोटं बोलताना जीभ कचरत नाही का, धनंजय मुंडेंचा सवाल

युतीसंदर्भात आज (सोमवार) रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार असल्याचे वृत्त विविध वाहिन्यांवर दाखवले जात आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. मुंबई, नाशिक आणि पुणे येथील जागांचा पेच या बैठकीत सुटू शकतो असे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांनीही याचसंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत युतीला मूर्त स्वरुप दिले जाईल. 

BLOG : निमित्तमात्र बनलेला अर्जुन

मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्यातच युतीची घोषणा होईल. तत्पूर्वी जागा वाटपासंबंधीच्या बैठका दोन्ही पक्षात होत आहेत. आगामी २४ तास युतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

नारायण राणेंचा भाजप प्रवेश युतीच्या वाटाघाटींवर अवलंबून, सूत्रांची माहिती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 cm devendra fadnavis and shiv sena party chief uddhav thackeray may declared alliance for election