पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीचा फॉर्म्युला ठरलाय, दोन दिवसांत कळवूः उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (ANI)

विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला हा लोकसभा निवडणुकीवेळीच ठरलेला आहे. फक्त दोन दिवस थांबा, त्याची माहिती कळवू, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील ५ वर्षांत शिवसेनेने सरकार दगा दिलेला नाही, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान, यावेळे शेतकरी नेते किशोरी तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने राम मंदिराबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर गुरुवारी नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे वाचाळवीरांनी यावर भाष्य करु नये, अशा शब्दांत फटकारले होते. याबाबत पत्रकारांनी उद्धव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पंतप्रधानांची भूमिका रास्त असल्याचे म्हटले. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाकडून न्याय मिळतोच. तो निःपक्ष असतोच. कोणताही दबावाला बळी न पडता निकाल दिला जातो, असेही ते म्हणाले. 

आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

मेट्रो कारशेडला आमचा विरोध नाही. आरेमध्ये तो होऊ नये अशी आमची आणि स्थानिकांचा मागणी आहे. नाणारलाही आमचा विरोध आहे. आमचा विकासकामांना विरोध नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची यादी आता मुख्यमंत्री सादर करतील असा टोलाही त्यांनी लगावला. युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 alliance formula is fixed within two days its will be declared says shiv sena chief uddhav thackeray