पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष एकत्र आले आहेत

ईव्हीएमचा मुद्दा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी येणार हे शुक्रवारी स्पष्ट झाले. ईव्हीएमवर शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या साह्याने मतदान घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. ईव्हीएमविरोधातील आंदोलनाला आपापले पक्ष बाजूला ठेवून सुरूवात करण्यात येणार असून, येत्या २१ ऑगस्टला यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी मुंबईत ही घोषणा करण्यात आली.

EVM वर आंदोलनाऐवजी विरोधक जनतेत गेले तर सहानुभूती मिळेल - फडणवीस

ईव्हीएमच्या विरोधात असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते. ईव्हीएमविरोधात 'लोकशाही वाचवा' हे आंदोलन या सर्व राजकीय पक्षांकडून छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन पक्षविरहित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी २१ तारखेला निघणाऱ्या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, ईव्हीएम नको, मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्याची मागणी राजकीय पक्ष म्हणून आम्ही करीत नाही. तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून करतो आहोत. आम्ही एक फॉर्म काढणार आहोत. हा फॉर्म राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यामध्ये मतपत्रिकांच्या साह्याने मतदान घ्यावे अशा आशयाचे निवेदन असेल. प्रत्येक व्यक्तीला आपले नाव त्यामध्ये लिहायचे आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे. २१ तारखेला राज्यातून आलेले हे सर्व फॉर्म मुंबईत निवडणूक आयोगाकडे दिले जातील. 

मला मातोश्री आणि वर्षाहून फोन येताहेत, विजय वडेट्टीवार यांचा दावा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदारसंघात घोळ असल्याचे समोर आले आहे. ५४ लाख वाढीव मते आढळून आली आहेत. ही मते कुठून आली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ईव्हीएममधील चीप अमेरिकेत तयार होते, असे निवडणूक आयोगाने मला सांगितले. पण अमेरिकेतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीवरून गोंधळ आहे. रशियाने त्यांना मदत केल्याचा आरोप होतो आहे, याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. 

अजित पवार म्हणाले, ईव्हीएमवर शंका घ्यायला वाव आहे. जगातील महत्त्वाच्या देशांमध्ये कुठेही निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जात नाही. त्यामुळे आपल्याकडेही निवडणुका मतपत्रिकांच्या साह्यानेच घेतल्या गेल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांना त्यांच्या घरातील मतेही न पडल्याचे दिसून आले, हे कसे काय शक्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 all opposition parties united against evm demanded ballot paper polling in election