पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... अखेर अजित पवार यांचा यू-टर्न, विरोधकांच्या सुरात मिसळला सूर!

अजित पवार

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) साह्याने निवडणूक घेण्यावर काही दिवसांपूर्वीपर्यंत विश्वास दर्शविणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. आपल्या आधीच्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी यू-टर्न घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेवर मतदारांचा विश्वास कायम राहण्यासाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

सपा-बसपाला धक्का बसण्याची शक्यता, आणखी खासदार भाजपच्या वाटेवर

आपल्या अधिकृत हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास पुनर्प्रस्थापित करण्यासाठी निवडणूक आयोगाने आगामी निवडणूक मतपत्रिकांच्या साह्याने घेतली पाहिजे. ईव्हीएमध्ये फेरफार केला जाऊ शकतो, अशी विरोधकांच्या मनात शंका आहे. अनेक विकसित देशांमध्ये निवडणूक मतपत्रिकांच्या साह्यानेच घेतल्या जातात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमविरोधात भूमिका मांडत आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार केला जातो. त्यामुळे मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेतली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पण त्यावेळी अजित पवार यांनी ईव्हीएमबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही, असे म्हटले नव्हते. पक्षाच्या पराभवाचा संबंध ईव्हीएमशी जोडला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले होते. 

माझी सुरक्षा कमी करावी, प्रियांका गांधींचे CM आदित्यनाथ यांना पत्र

गेल्या महिन्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव पुन्हा निवडून आले. पण लोकसभा निवडणुकीत त्यांची मुलगी के कविता पराभूत झाल्या. जर ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकला असता, तर हे बदल कसे घडले असते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.