पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपचे ८ उमेदवार जाहीर; पुण्यातून अभिजित मोरे, संदीप सोनावणे लढणार

पुण्यातून अभिजित मोरे, संदीप सोनावणे लढणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षानेही आपल्या पहिल्या यादीत ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये ब्रह्मपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरी पूर्वसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरूडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वती मतदारसंघातून संदीप सोनावणे यांचा समावेश आहे.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी आपचे नेत्या प्रीती मेनन, धनंजय शिंदे आदी नेते उपस्थित होते. 

धनंजय शिंदे यांनी सरकारवर टीका केली. आम आदमी पक्षाबद्दल महाराष्ट्रातील जनता प्रचंड उत्सुक आहे. आपने येणारी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताच पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ६५० लोकांनी आपकडून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज पाठवले, असल्याची माहिती त्यांनी दिली. आम आदमी पक्षाने छत्रपती शिवरायांच्या 'स्वराज्य' संकल्पनेवर चालून दिल्लीच्या रयतेला विकासाचे खरे मॉडेल दिले. 'आप' आता महाराष्ट्र विधानसभेत सामान्य माणसाच्या आवाज बुलंद करेल, असेही ते म्हणाले.

आम आदमी पक्ष सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून महाराष्ट्रात येत आहे. सरकारकडून दिली जाणारी खोटी आश्वासने, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि वाढत चाललेल्या बेरोजगारी विरोधात आप लोकांचा आवाज बनून उभा राहील, असे प्रीती मेनन म्हणाल्या.

आम आदमी पक्ष सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून महाराष्ट्रात येत आहे. सरकारकडून दिली जाणारी खोटी आश्वासने, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि वाढत चाललेल्या बेरोजगारी विरोधात आप लोकांचा आवाज बनून उभा राहिल, असा विश्वास त्यांनी दिला.