पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबवली; ७०० प्रवासी गाडीत अडकले

महालक्ष्मी एक्स्प्रेस

मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवेवर झाला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांगणी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. दरम्यान, महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये ७०० पेक्षा अधिक प्रवासी अडकले आहेत.

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपच्या वाटेवर?

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी रेल्वे ट्रकवर आल्यामुळे बदलापूर ते कर्जत रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वांगणी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे ट्रॅकवर २ फूटापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. एक्स्प्रेसमध्ये ७०० पेक्षा अधिक प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तसंच आसपासच्या सामाजिक संस्थांना मदत करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Mumbai Rains Live Update: पुणे- मुंबई रेल्वे मार्गावर दगड कोसळली; पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेस ज्याठिकाणी अडकली आहे त्याठिकाणी रेल्वे संरक्षण दल आणि पोलिसांनी धाव घेतली आहे. एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बिस्किट आणि पाणी वाटप केले जात आहे. एनडीआरएफची ४० जवानांची टीम थोड्याच वेळात घटनास्थळी पोहचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.