पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रिमंडळ विस्तार: 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

महाविकास आघाडी सरकार

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा अखेर सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी विधानभवनाच्या प्रांगणात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान तिन्ह पक्षांचे कोण-कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनी राज्यामध्ये स्थापन झालेल्या   महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाता अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राज्यामध्ये तब्बल चौतिसाव्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तिन्ही पक्षांकडून काही मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या काही नेत्यांच्या नावांची संभाव्य यादी समोर आली आहे. 

शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेणारे नेते - 

अनिल परब, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, दादा भुसे, संजय राठोड, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), शंकरराव गडाख (अपक्ष), बच्चू कडू (अपक्ष), संदीपान भुमरे

राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची शपथ घेणारे नेते - 

अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, अदिती तटकरे, दत्ता भरण, संजय बनसोडे.

काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेणारे नेते - 

अशोक चव्हाण, के. सी पाडवी, अमित देशमुख, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल.