पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चूक झाली, पियूष गोयल यांनी व्यक्त केली दिलगिरी

पियूष गोयल

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताशी चुकीच्या व्यक्तीचे नाव जोडल्यामुळे सोशल मीडियात ट्रोल झाल्यावर केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी घडल्या प्रकारावरून दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चुकी झाल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले.

भाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय म्हंटलय?

पियूष गोयल म्हणाले, चुका कोणाकडूनही होऊ शकतात. चुकांना घाबरणारा मी नाही, असे त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये राजधानी एक्स्प्रेसच्या नव्या फेऱ्यांचे उदघाटन करताना सांगितले. त्याचबरोबर लोकांनी केवळ माझ्या बोलण्यातील चूक शोधून तेवढाच मुद्दा उचलून धरला. मला नेमके काय सांगायचे होते, हे त्यात बाजूला राहून गेले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना पियूष गोयल म्हणाले होते की, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाकडे केवळ गणिताच्या दृष्टीने बघू नका. जर पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व्हायचे असेल, तर सध्या विकासदर १२ टक्के असायला हवा. पण सध्या तो ६-७ टक्केच आहे. त्यामुळे गणितात पडू नका. गणिताचा उपयोग अल्बर्ट आईनस्टाईनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना झाला नव्हता. 

चिदंबरम यांना पुन्हा धक्का, दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळली

त्यांच्या याच वक्तव्यावरून सोशल मीडियात अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते.