पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिरुरचा उमेदवार देताना कसला विचार केला, तावडेंचा पवारांना सवाल

विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत आता जातीपातीच्या आधारावर मते मिळणार नाहीत हे कळायला लागल्यानंतर जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असावे, असा टोला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज लगावला.

प्रसार माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. पण पवार यांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यानंतर लोकांना माहित असते, त्यामागे त्यांचे म्हणणे काय आहे.  पण शिरूरचा उमेदवार देताना काय विचार केला होता. मातीचा केला होता का जातीचा केला होता, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अजित पवार यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्य़े साम दाम दंड भेद याचाच वापर केला. गेल्या खेपेस लोकसभा निवडणुकीत त्यांची क्लिप व्हायरल झाली होती, त्यात ते काय बोलले होते ते त्यांनी जरा आठवून बघावे, विनाकारण दुस-यांवर आरोप करू नये, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत देशासाठी काय केले, हे सांगण्यासाठी काहीच हातात नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.