पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोळंबकर लवकरच भाजपमध्ये, राहुल शेवाळेंना पाठिंबा

कालिदास कोळंबकर

मुंबईमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपण लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कालिदास कोळंबकर एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ते म्हणाले, माझ्या वडाळा विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न भाजप सरकारने सोडवले आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आणि पोलिसांना घरे बांधून देण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यात काँग्रेस पक्ष निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

वडाळा मतदारसंघ लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये येतो. या मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वडाळा मतदारसंघातून शेवाळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे कोळंबकर यांनी म्हटले आहे.

कोळंबकर हे स्वतः एकेकाशी कट्टर शिवसैनिक होते. पण २००५ मध्ये नारायण राणे यांन शिवसेनेला रामराम ठोकल्यावर कोळंबकर हे त्यांच्यासोबत बाहेर पडले होते.