पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या ऐतिहासिक विजयानंतर बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

मोदी बॉलिवूड

लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय मिळवला.  २०१४ मधील जागांच्या तुलनेत यंदाच्या  भाजपच्या लोकसभेतील जागांमध्ये वाढ झाली आहे. यावेळी भाजपने स्बळावर ३०० चा आकडा पार केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीलंका, नेपाळ , चीन , जपान, अफगाणिस्तान, इस्त्रायल, रशिया या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर समस्त बॉलिवूडमधूनही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.   गेल्या वर्षभरात मोदींनी  दोनदा बॉलिवूड  कलाकारांची भेट घेतली. चित्रपटसृष्टीतील समस्या जाणून घेतल्या.  मतदानाआधी  त्यांनी बॉलिवूडच्या समस्त कलाकारांना  ट्विटरवर टॅग करून मतदानाविषयी जनजागृती करण्याचं आवाहान केलं होतं. मोदींच्या विजयानंतर बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवर मोदींना शुभेच्छा  दिल्या.


अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमारनं मोदींना ऐतिसाहिक विजयाच्या शुभेच्छा  दिल्या आहेत. निवडणुकांच्या काळात अक्षय कुमारनं  स्वत: मोदींची एक  हलकीफुलकी मुलाखत घेतली होती. 

अजय देवगन या देशाला योग्य काय आहे ते माहिती आहे त्यांनी निवड केली आहे असं अजय म्हणाला.

सलमान खान  
एक बलशाली भारत निर्मितीत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असं सलमान खान म्हणाला 

करण जोहर

सोनम कपूर

भूमि पेडणेकर

एकता कपूर

रजनीकांत

कंगना रणौत

गुरूवारी झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता या पक्षानं कायम राखली आहे. शनिवारी पक्षाची बैठक होणार असून त्यात मोदी यांची पतंप्रधानपदी पुन्हा निवड केली जाईन.