पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आम्ही सुरुवातीपासूनच सावध होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुप्त लाट होती. तिचे सुनामीत रुपांतर होईल असा विश्वास होता. हा अभूतपूर्व विजय पंतप्रधान मोदी यांनी मिळवलेला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या निवडणुकीत महायुतीने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. अनेक राजकीय पंडित हे मानायला तयार नव्हते. पण आमच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड विश्वास होता. राज्यात दुष्काळ आहे. अनेक समस्या आहेत. या समस्येतून राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारच बाहेर काढू शकतात, असा जनतेला विश्वास आहे. इतका मोठा विजय हा आनंद देणारा आहे. तसेच झोप उडवणाराही आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले. 

lok sabha election result 2019: राजू शेट्टींचं चुकलं काय ?

यावेळी फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी महायुतीत चांगला समन्वय ठेवल्याचे त्यांनी म्हटले. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही निश्चितच चांगले काम करु असेही त्यांनी म्हटले.