पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन सुरुच, राज्यात २२ हजार २१२ FIR दाखल

कोरोना

वारंवार बजावूनही अनेकांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नाहीये. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे, मात्र अनेकजण निष्काळजीपणा दाखवत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. राज्यात आतापर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात २२ हजार २१२ FIR दाखल करण्यात आल्या आहेत, तर पोलिसांनी ६ हजार ७६५ वाहने कारवाई करत ताब्यात घेतले आहेत.

कनिकाचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

शनिवारी एकट्या मुंबईत  ८८ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत  त्यातल्या ६८ लोकांनी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. मुंबईत २० मार्च पासून १ हजार ८३८ लोकांविरोधात पोलिसांनी ९७६ एफआयआर दाखल केल्या आहेत. ९७६ एफआयआर पैकी ५१८ एफआयआर या जमावबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आहेत. तर ३२५ एफआयआर या बेकायदेशीर वाहनं रस्त्यावर आणल्याप्रकरणी आहेत.

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी जमावबंदीला परवानगी नाही. मात्र लोक एकत्र जमून या नियमांचं उल्लंघन करत आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे, आतापर्यंत पोलिस स्थानकात अनेक तक्रारी येत आहेत यातल्या बहुतांश तक्रारी या लोक एकत्र जमून नियमांचे उल्लंघन करण्याबदद्ल आहेत.