पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ३,६३४ मुंबईकरांवर गुन्हा दाखल

पोलिस नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. दिसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ होत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक मुंबईकर गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहे. अशा ३,६३४ मुंबईकरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

लॉकडाऊन इफेक्ट, इंधन वापरामध्ये दशकातील सर्वात मोठी घट

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी मुंबई पोलिसांनी ४६४ जणांविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर २० मार्चपासून ते आतापर्यंत ३,६३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या २,८५० जणांची बुधवारी जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुप्पट

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, प्रवास करु नये, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहे. अशांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वारंवार विनंती करु जे लोकं ऐकणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. 

... म्हणून कनिका कपूरची पोलिस चौकशी २० एप्रिलनंतरच

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lockdown mumbai police have been registered 3634 cases against violators since 20th march