कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वजण दिवस-रात्रं मेहनत करत आहेत. याच कोरोना योध्दांवर हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कोरोना योद्धांवरील हल्ले यापुढे खपवून घेणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खडसावून सांगितले आहे.
पोलीस तसेच इतर कोणत्याही कोरोना योध्द्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाही.#WarAgainstVirus pic.twitter.com/6eyiHLoQmL
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 28, 2020
गृहमंत्र्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत सांगितले की, महाराष्ट्रात पोलिसांवर काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. पोलिसांवरचा हल्ला राज्य शासन सहन करणार नाही. ज्या ज्या ठिकाणी पोलिस, डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवर जे दिवस-रात्रं काम करत आहेत. त्याच्यावर हल्ला होईल तिथे पोलिसांच्या माध्यमातून कठोर शासन केले जाईल. आतापर्यंत १५३ हल्ले पोलिसांवर झाले आहेत. यामधील ५३५ आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुढील काळात अशाप्रकारे हल्ले सहन करणार नाही. हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.
गूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ वर पोहचला आहे. तर मंगळवारी एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण आढळले असून ३१ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात आतापर्यंत ४०० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.