पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: पायी घरी जाणाऱ्या ७ जणांना टेम्पोने चिरडले, चौघांचा मृत्यू

विरार अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरु

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीतील भारोल परिसरात भरधाव टेम्पोने ७ जणांना चिरडले. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे हे सर्वजण आपल्या गावाकडे पायी चालत जात होते. त्याच दरम्यान ही घटना घडली. 

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ७४८ वर, तर १९ जणांचा मृत्यू

लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी गाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी पायी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. अशातच गुजरातमधील आपल्या घराकडे चालत जाणाऱ्या ७ प्रवाशांना मुंबई-अहमदाबाद मार्गावर भरधाव टेम्पोने चिरडले. विरार हद्दीत भारोल परिसरात हा अपघात झाला. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली.

सोनिया गांधींची PM मोदींकडे कळकळीची विनंती!

अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून एकाची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व जण लॉकडाऊनमुळे आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. मात्र गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. वसईच्या दिशेने परत येत असताना त्यांना टेम्पोने चिरडले. अपघातातील ५ जणांची ओळख पटली आहे. विरार पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. 

COVID 19 : इटलीत २४ तासांत विक्रमी मृत्यूतांडव!