पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीएसएमटी स्थानकावर लोकल बफरला धडकली

लोकल बफरला धडकली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठा अनर्थ टळला. लोकल बफरला धडकली. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणी जखमी झाले नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. 

पद्मसिंह पाटलांसंबधीच्या प्रश्नांवर शरद पवार भडकले

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. धिम्या मार्गावरुन लोकल सीएसएमटी स्थानकावरील प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर येत होती. त्याच दरम्यान लोकल बफरला धडकली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला. 

शशी थरुर यांनी पुन्हा मोदींचे केले कौतुक, आव्हानही स्वीकारले

दरम्यान, या घटनेनंतर फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. अपघातानंतर ही लोकल कुर्ला कारशेडला रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी देखील लोकलने बफरला धडक दिल्याच्या घटना घडल्या आहेत. 

वार्निश कोटिंगच्या १०० रुपयांच्या नोटा लवकरच येणार चलनात