पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एका माथेफिरुमुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा झाली विस्कळीत

अग्नीशमन दलाच्या जवानांनी तरुणाला खाली उतरवले

ठाणे रेल्वे स्थानका जवळील ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून एका तरुणाने मध्य रेल्वे लोकल वाहतूकीचा खळखंडोबा केल्याचा प्रकार बुधवारी घडला. कार्यलयीन वेळा संपण्याच्या सुमारासच ही घटना घडल्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडवली. तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी या लाईनवरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.  

मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्पच; एसटीच्या ज्यादा बसेस धावणार

जवळपास पाऊण तास हा तरुण ओव्हरहेड वायरच्या खांबावर बसला होता. परिणामी मध्य रेल्वे प्रशासनाला या मार्गावरील लोकल गाड्या बंद कराव्या लागल्या. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर थांबवण्यात आल्या होत्या. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या तरुणाला खांबावरुन खाली उतरवण्यात आले. त्यानंतर खोळंबलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात आली.