पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॅग फेकल्यामुळे वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला लागली आग

लोकलच्या पेंटाग्राफला आग

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली. सीएसएमटीवरुन पनवेलकडे जाणारी लोकल वाशी स्थानकावर आली असता पेंटाग्राफला अचानक आग लागली. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे पाहताच प्रवाशांनी लोकलमधून बाहेर धाव घेतली. वाशी स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. अज्ञात व्यक्तीने लोकलच्या पेंटाग्राफवर बॅग फेकल्यामुळे आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी बंद; या मार्गावरुन करा प्रवास

सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल साडेनऊच्या सुमारास वाशी स्थानकावर आली. या लोकलच्या पेंटाग्राफमधून धूर येत होता. त्यानंतर पेंटाग्राफला अचानक आग लागील. वाशी स्थानकावरील प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर ही घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती कळातच रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. एका अज्ञात व्यक्तीने लोकलच्या पेंटाग्राफवर बॅग फेकल्यामुळे ही आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती, मध्य रेल्वेचे पीआरओ ए. के जैन यांनी दिली आहे. दरम्यान, ही लोकल सानपाडा कारशेडला पाठवण्यात आली आहे. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.  

अपाचे आणि राफेलमुळे पाकिस्तान घाबरला; चीनकडे मागितली मदत