पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिवाळ्यात पावसाळा; मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ

मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. मात्र डिसेंबर महिना सुरु होऊन देखील मुंबईत थंडीची चाहूल लागली नाही. अशामध्ये मुंबईत पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकर सुखावला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागामध्ये गुरुवारी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 

CM ठाकरे अन् PM मोदींच्या भेटीचा मुहूर्त ठरला!

स्कायमेट वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात एकाच वेळी 'पवन' आणि 'अम्फन' नावाची दोन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या अनेक भागामध्ये येत्या २४ तासात हलक्या स्वरुपात पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 

पी.चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका

दरम्यान, पवन आणि अम्फन ही दोन चक्रीवादळे एकाच वेळी निर्माण होण्याची भिती असल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने पुढे सरकणार आहे. आधी ते उत्तर पश्चिम दिशेला त्यानंतर ते पश्चिम दिशेला पुढे सरकणार आहे. तर अम्फन चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रात घोंघावत आहे. या चक्रीवादळामुळेच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. 

अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील: एकनाथ शिंदे