पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हाफिज सईदला अटक केल्याचे सांगून पाकिस्तान जगाला वेडं बनवतंय'

उज्ज्वल निकम

लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संगटनेचा म्होरक्या आणि मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली. मात्र हाफिज सईदला अटक केल्याचे सांगून पाकिस्तान संपूर्ण जगाला वेडे बनवत असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. उज्ज्वल निकम हे देशातील प्रसिध्द सरकारी वकील आहेत. गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरणा यांसारख्या चर्चित हत्या प्रकरण आणि दहशतवादी हल्ला प्रकरणात उज्ज्वल निकम हे सरकारी वकिल राहिले आहेत. अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यापासून ते १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात ते वकील राहीले आहेत.

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला अटक

जगातील मोठ्या देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकल्यानंतर आतंरराष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली. मात्र यावर प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात जे पुरावे सादर केले त्यामुळे पाकिस्तानने नाईलाजाने ही कारवाई केली आहे. पाकिस्तान हाफीज सईदला अटक केल्याचे सांगून जगाला वेडे बनवत आहे. पाकिस्तानच्याया ढोंगीवृत्तीला न भूलता भारताने सावध राहिले पाहिजे. यावर पाकिस्तान न्यायालयासमोर काय पुरावे सादर करतात. त्याला शिक्षा देण्यासाठी काय प्रयत्न करते हे पाहणे महत्वाचे आहे. नाही तर हे सर्व नाटक असेल, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. 

१५ दिवसांत प्रकरणं मार्गी लावा नाहीतर..ठाकरेंचा विमा कंपन्यांना इशारा

हाफिज सईदला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. पाकिस्तानमधील माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला अटक करुन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिज सईदचा हात होता. त्याचबरोबर २००६ मध्ये मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधारही तोच होता.

कर्नाटकात विश्वासदर्शक ठरावावेळी काय घडू शकते, तीन शक्यता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lawyer ujjalwal nikam said Pakistan is fooling the world that they have arrested hafiz saeed