पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निःशब्द! लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो

लता दीदींनी ऋषीकपूरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे.

बालपणीच वडील राजकपूर यांच्यासोबत 'श्री ४२०' आणि 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाउल ठेवलेल्या ऋषी कपूर यांनी गुरुवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांच्या निधनाचे वृत्त ताजे असतानाच दुसऱ्या दिवशी चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा निखळल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. चित्रपटसृष्टीसह, राजकीय आणि इतर क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अनेकजण त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. मी निःशब्द आहे, अशी प्रतिक्रिया लता दीदींनी दिली आहे. 

दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी ऋषीजींनी मला त्यांचा आणि माझा एक फोटो शेअर केला होता. ते सर्व दिवस, त्या सर्व आठवणी जाग्या होत आहेत. मी निशब्द आहे, असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केलाय. यात चिमुकल्या मुलासह दिसत आहेत. तो चिमुकला मुलगा म्हणजेच ऋषी कपूर आहेत.   

पाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत

काय बोलाव? काय लिहाव काहीच समजत नाही. ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त दुख:दायी आहे.  त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत एक खूप मोठे नुकसान झाले आहे. हे दु:ख सहन करणे माझ्यासाठी खूप कठिण आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो! असे ट्विट लता मंगेशकर यांनी अधिकृत ट्विट अकाउंटवरुन केले आहे. ऋषी कपूर यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोब काम केले आहे. त्यांच्याकाळातील दिग्गजांमध्ये विशेष ओळख मिळवण्यातही ते यशस्वी ठरले होते. त्यांच्या 'बॉबी' या चित्रपटासह अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.