पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीवूडमध्ये किड्यांचा उच्छाद; नागरिक हैराण

सीवूडमध्ये किड्यांचा उपद्रव

नवी मुंबईतील सीवूड परिसरामध्ये किड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सीवूड्स रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या परिसरामध्ये हे किडे पसरले आहेत. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात हे किडे आणि आळ्या आहे. याठिकाणावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर किडे आणि आळ्या पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाला खाज आणि लाल डाग येत आहेत. 

रस्त्यावर प्रचार सभा घेऊ द्या; मनसेची निवडणूक आयुक्तांकडे मागणी
 
सीवूड रेल्वे स्थानकावरुन नवी मुंबई महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या झाडांवर या किड्यांचा सुळसुळाट आहे. स्टेशन परिसरातील भिंती, बिल्डिंगच्या भिंतींवर हे किडे बसले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्यांनी या झाडांवर पाण्याची फवारणी केली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबईत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. या पावासानंतर सीवूडमध्ये अचानक आलेल्या या किड्यांमुळे नागरिकांमध्ये भितेचे वातावरण आहे. 

पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल