पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीची राहत्या घरात आत्महत्या

अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीनं वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून  आत्महत्या केली आहे. कुशल ३७ वर्षांचा आहे. त्याला लहान मुलगा देखील आहे. कुशल पाली हिल्स येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. वांद्रे पोलिसांना मृतदेहाशेजारी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील सापडली आहे. 

कारगिल युद्धातील हिरो मिग-२७ आज निवृत्त

कुशलनं रात्री आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी धरू नये असंही कुलशनं चिठ्ठीत लिहिलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुशलच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कुशलचे आई- वडिल त्याला गुरूवारी दुपारी २ वाजल्यापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते मात्र कुशलनं फोन उचलला नाही. त्यामुळे त्याचे पालक रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी पावणेअकरा नंतर बनावट चावीनं घर उघडण्याचा प्रयत्न केला .जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा कुशल त्यांना मृतावस्थेत आढळला अशी माहिती पोलिसांनी दिली.

कुशलच्या अनपेक्षित निधनानं मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना  धक्का बसला आहे. कलाविश्वातून कुशलच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.  'इश्क मे मरजावा' मालिकेत कुशलनं शेवटचं काम केलं होतं.

कझाकिस्तानमध्ये विमान अपघात, ९ ठार

  'झोर का झटका' हा रिअॅलिटी शो  जिंकून कुशल चर्चेत आला  होता. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये कुशलनं काम केलं आहे. 'आसमान से आगे', 'फिअर फॅक्टर', 'पैसा  भारी  पडेगा', 'एक से बढकर एक', 'झलक दिखला जा' सारख्या अनेक मालिका आणि रिअॅलिटी  शोमध्ये तो दिसला.