पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून नितीन सरदेसाई यांची चौकशी

नितीन सरदेसाई

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सहकारी आणि माजी आमदार नितीन सरदेसाई ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना देखील ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या नोटीसनंतर नितीन सरदेसाई आज ईडी कार्यालयात हजर झाले आहे. कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये नितीन सरदेसाई यांचा देखील सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र आणि कोहिनूर सीटीएनएल कंपनीचे मालक उन्मेष जोशी यांची देखील ईडीकडून चौकशी झाली आहे. २२ ऑगस्ट रोजी ईडीने राज ठाकरे यांची चौकशी केली होती. ईडीकडून तब्बल साडेआठ ते नऊ तास राज ठाकरे यांची चौकशी झाली. मात्र भविष्यात वेळ पडल्यास ईडीचे अधिकारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतात. त्यामुळे तुर्तास राज ठाकरेंना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.

मलेशियासोबतच्या चर्चेत मोदींनी मांडला झाकीर नाईक प्रत्यार्पणाचा मुद्दा

मुंबईतील कोहिनूर सीटीएनएल कंपनीची जागा राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी यांनी खरेदी घेतली होती. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने संबंधितांना ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे.

... म्हणून प्रवाशांसह इंडिगोचे विमान सात तास धावपट्टीवर अडकले