पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंना अडचणीत आणणारे कोहिनूर प्रकरण नेमकं काय आहे?

कोहिनूर प्रकरण आणि राज ठाकरे

अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी चौकशीसंदर्भात नोटीस पाठवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना ईडीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना धाडण्यात आलेल्या नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून राजकीय षडयंत्र रचण्यात येत असल्याचा सूर विरोधकांमधून उमटत आहे. पण प्रश्न उरतो तो राज ठाकरे यांना ज्या कोहिनूर प्रकरणाबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे ते प्रकरण नेमकं काय आहे? आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं काय आहे?

 

Raj Thackeray : कोहिनूर प्रकरण,राज ठाकरे आणि ईडी चौकशी संदर्भातील संपूर्ण अपडेट्स

दादरमध्ये ४ एकर जागेत कोहिनूर स्केवअर टॉवर उभा आहे. यापूर्वी या जागेवर कोहिनूर मिल क्रमांक ३ होती. ही मिल बंद पडल्यानंतर या जागेचा ताबा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनने घेतला होता. त्यांनी २००५ मध्ये या जागेचा लिलाव करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा मुलगा आणि व्यावसायिक उन्मेष जोशी यांच्या मालकीच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी  संयुक्तरित्या लिलावात ही जागा खेरदी केली. यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून ४२१ कोटींची बोली लावण्यात आली होती. 

PHOTOS : ईडीच्या कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त

उन्मेष जोशी यांच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसने (आयएलअ‍ॅण्डएफएस) कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी ८६० कोटी इतकी गुंतवणूक केली होती. यातील काही गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसला नुकसान झाल्याचा ईडीला संशय आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसने (आयएलअ‍ॅण्डएफएस) आपल्या शेअर्सची विक्री केल्यानंतर राज ठाकरे यांच्या मातोश्री इन्फास्ट्रक्चर कंपनीने २००८ मध्ये आपले शेअर्स विकले. ज्यावेळी त्यांनी या प्रकल्पात गूंतवणूक केली त्यावेळी राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये होते. २००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी २००८ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापन केली होती. राज यांची गुंतवणूक आणि शेअर्स विक्री करुन प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. 

कोहिनूर स्केवअरबद्दल थोडक्यात माहिती

दादरमधील शिवसेना भवनासमोरील ५२ आणि २५ मजली टॉवरमधील मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, १५ व्या मजल्यांवर जवळपास २ हजार गाड्यांसाठी भव्य पार्किंग, ४७ व्या मजल्यावर आलिशान सदनिका आणि पंचतारांकित हॉटेल असे नियोजन असलेल्या संपूर्ण प्रकल्पाती किंमतही  २ हजार १०० कोटी इतकी आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद होते. २६ जानेवारीपासून प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु झाले असून पुढील १५ ते १८ महिन्यात प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.