पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची निवड झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. शिवसैनिकांकडून महापालिकेबाहेर जल्लोष करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला. 

५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री; तिन्ही पक्षांची सहमती: संजय राऊत

किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किशोर पेडणेकर आणि सुहास वाडकर यांना शुभेच्छा दिल्यात. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेनेकडून पालिका मुख्यालयात फुलांची सजावट करण्यात आली. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करणार आहेत.  

केईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज अपयशी