पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन दिवसानंतर कर्जत- बदलापूर लोकलसेवा पूर्वपदावर

मुंबई लोकल

शनिवार आणि रविवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकसेवा खोळंबली होती. बदलापूर ते कर्जत दरम्यान पावसामुळे रेल्वे रुळावरील खडी वाहून गेल्याने रुळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली होती. अखेर आज पहाटेपासून ही लोकसेवा पूर्वपदावर आली आहे. आज पहाटे कर्जतवरुन सीएसएमटीला पहिली लोकल रवाना झाली. 

दिल्लीत इमारतीला भीषण आग; 5 जणांचा मृत्यू 11 गंभीर जखमी

बदलापूर ते कर्जत परिसराला शनिवारी पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे या भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये रेल्वे रुळावर पावसाचे पाणी आल्यामुळे रेल्वे रुळावरील खडी वाहून गेली होती त्याचसोबत तांत्रिक बिघाड देखील झाला होता. त्यामुळे बदलापूर ते कर्जत अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले होते 

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

मात्र, दोन दिवस रेल्वे रुळावरील खडी आणि तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरु होते. ते पूर्ण झाल्यानंतर आज पहाटेपासून बदलापूर ते कर्जत लोकलसेवा पूर्व पदावर आली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे कर्जतवरुन मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अटक