पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या करण ओबेरॉयला जामीन मंजूर

करण ओबेरॉय

बलात्कार व खंडणीच्या आरोपाखाली ६ मेपासून अटकेत असलेला अभिनेता करण ओबेरॉयला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं  जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास आतापर्यंत ज्याप्रकारे  झाला आहे त्यावर न्यायमूर्तीं  रेवती मोहिते-डेरे  यांनी नाराजी व्यक्त केली. 

२०१६ मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून  आमची ओळख झाली, त्यानंतर करणने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. तसेच अतिप्रसंगाचे चित्रिकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी देत पैसेही उकळले', असा आरोप महिलेनं केला. महिलेच्या तक्रारीवरून करणला ६ मे रोजी  अटक करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी सुरू होती  त्यानंतर करणनं गेल्याच महिन्यात   दिंडोशी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता  मात्र  करणचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता. 

Karan Oberoi case : वकिलानेच केला पीडितेवर हल्ला
 

सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर करणने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून शुक्रवारी  करणला दिलासा मिळाला. आरोपीने २० जूनला ओशिवरा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी. तसेच तक्रारदार महिलेशी किंवा या प्रकरणाशी संबंधित लोकांशी संपर्क करू नये आणि खटल्याच्या सुनावणीत सहकार्य करावे अशा अटींवर ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र या प्रकरणातील पोलीस तपासावर न्यायमूर्ती यांनी नाराजीही वर्तवली आहे.