पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणी कपात

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणी कपात

मोहिली आणि बारावे या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्यानं, मंगळवारी ७ जानेवारीला कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद राहिल. ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा १२ तास बंद करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच रात्री ८ नंतर कल्याण- डोंबिवलीकरांचा पाणीपुरवठा पूवर्वत करण्यात येईल, अशी माहिती  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. 

बुलढाणा जिल्ह्यात बस अपघात, २३ विद्यार्थी जखमी

७ जानेवारीला मोहिली जलशुद्धीकरण आणि मोहिली उदंचन केंद्र त्याचबरोबर बारावे जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व यांत्रिकी उपकरणाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे, अशी माहिती कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेनं दिली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेनं केले आहे. 

३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा - लष्करप्रमुख