पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU हिंसाचारः आझाद मैदानावरील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

आझाद मैदानावर जमा झालेले आंदोलक विद्यार्थी (photo by Anshuman poyrekar)

दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. गेट वे ऑफ इंडिया येथील हे आंदोलन पोलिसांनी सामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना त्रास होत असल्याचे कारण देत आझाद मैदानावर हलवले होते. अखेर या आंदोलक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावरील आपले आंदोलन मागे घेतले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील आमचे ठिय्या आंदोलन यशस्वी झाले असून आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत. पण आमचा विरोध कायम आहे, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. 

JNU हिंसाचारः गेट वे ऑफ इंडिया येथून आंदोलकांची आझाद मैदानावर रवानगी

रविवारी सांयकाळी जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मुंबईत रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत गेट वे ऑफ इंडिया येथे ठिय्या आंदोलन सुरु केले होते. पोलिसांनी मंगळवारी सकाळी येथील आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया येथून आझाद मैदानावर आणून सोडले. 

शिवसेनेचे चंद्रशेखर जाधव हल्ल्यात गँगस्टर पुजारीचाच हात, चौथा आरोपी अटकेत

गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करण्यास परवानगी नसतानाही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सामान्य नागरिक तसेच पर्यटकांना समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु, आंदोलक पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अखेल बलप्रयोगाचा वापर करुन पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर हलवले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या.

'जेएनयूतील हल्ल्याने २६/११ची आठवण करुन दिली'

आझाद मैदानावर आल्यानंतरही आंदोलक गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करण्यावर आग्रही होते. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आंदोलकांनी आमचे आंदोलन यशस्वी झाले असून आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.