पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'१६२ आमदारांना राज्यपालांसमोर उभं करण्याची आमची तयारी'

जयंत पाटील

राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपाल कार्यालयात दिले आहे. दरम्यान, 'राज्यपालांनी आम्ही दिलेले १६२ आमदारांच्या सह्याच्या पत्राचा सन्मान ठेवत आम्हाला सरकार स्थापनेची संधी द्यावी', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. तसंच, '१६२ आमदारांना राज्यपालांसमोर उभं करण्याची आमची तयारी', असल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

'सरकार बहुमत सिध्द करु शकली नाही तर महाराष्ट्रातील दुसरे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करुन दाखवू शकते हे स्पष्ट झाले आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. एका रात्रीत तयार झालेले सरकार लोकांना मान्य नाही. आम्ही चांगले काम करुन दाखवू देऊ.', असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले. 

आता सुप्रीम कोर्टाचे उद्यापर्यंत 'वेट अँड वॉच'

'राष्ट्रवादीचे ५४ आमदारांपैकी ५१ आमदारांनी सरकार स्थापनेला समर्थन दिले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अजित पवार, अण्णा बनसोड आणि आत्राम हे तीन आमदार सोडून बाकी सर्व राष्ट्रवादीसोबत आहेत. ५४ पैकी ५३ आमदारांचे समर्थन आम्हाला मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. 

... या मागे माझा हात असल्याचे म्हणणे चुकीचे - शरद पवार

दरम्यान, अजित पवार यांना आधी भेटलो. आज पुन्हा भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यासाठी शेवटचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. आमचे ५४ आमदार सोबत असावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार नाही आले तर अंतिम निर्णय घेऊ, असे देखील त्यांनी सांगितले. 

सत्ता नसेल तर भाजपचे लोक वेडे होतीलः संजय राऊत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jayant patil says we are in a position to bring 162 mlas before maharashtra governor at any given time