पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार निर्णय घेतील'

जयंत पाटील Pramod Thakur/Hindustan Times

उपमुख्यमंत्री पदावरुन अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होणार असल्याची देखील माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांनी दिली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच निर्णय घेतली, असे राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार शपथ घेणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

'आज फक्त मुख्यमंत्री आणि ६ मंत्र्यांचा शपथविधी'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांची शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे मंत्री पदाची शपथ घेतील असा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मुख्यमंत्र्यासोबत तिन्ही पक्षाकडून प्रत्येकी दोन-दोन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात मोदी-शहांचा डाव अपयशी ठरला: सोनिया गांधी

अखेर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजीपार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होणार - सूत्र