पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेचा तिढा कायम: आता राज्यपालांकडून NCPला निमंत्रण!

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत असताना भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेदामुळे विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवलेल्या राष्ट्रवादीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले असून यासंदर्भात काँग्रेससोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यपालांनी भेटण्यासाठी बोलावले - अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे- पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटी दरम्यान  राज्यपालांनी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला २४ तासांचा अवधी दिला आहे. उद्या संध्याकाळी साडेआठपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसशी बोलून उद्या याबाबत निर्णय घेऊन असे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, उद्या दुपारी १ वाजता मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. 

शिवसेनेने वेळ वाढवून मागितला होता - आदित्य ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा ठरलेल्या भाजपने सर्वात पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापन करण्यामध्ये असमर्थ असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेने राज्यपालांची भेट घेतली. पण त्यांना पाठिंब्यासंदर्भातील पुरावा सादर करता आला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली. शिवसेना ज्यांच्यावर अवलंबून होते त्यांना आता सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळाले असून राजकीय तिढा प्रक्रियेच्या माध्यमात अडकल्याचे चित्र दिसत आहे.

आघाडीवर भरवसा ठेवल्याने शिवसेना अडचणीत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jayant Patil says governor has given us the letter being the 3rd largest party in maharashtra