पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधी पक्षाच्या समजुतदारपणाचे कौतुक: जयंत पाटील

जयंत पाटील

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांचे आभार मानले आहे. विरोधी पक्षाच्या समजुतदार पणाचे कौतुक, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसंच काल झालेलं नुकसान आज भरुन काढलं असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

विधानसभा अधिवेश, हंगामी अध्यक्ष निवड आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी यावर आक्षेप घेत भाजपने सभात्याग केला होता. त्यावर जयंत पाटील यांनी टीका करत भाजपने काल झालेले नुकसान आज भरुन काढलं असल्याची टीका केली आहे. तसंच एकदा त्या खुर्चीवर बसले की डाव्या बाजूचे ऐकायला येत नाही असा देखील टोला त्यांनी लगावला आहे. 

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

दरम्यान, ठाकरे सरकार दुसऱ्या परिक्षेमध्ये देखील यशस्वी झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नाना पटोले यांची निवड झाली आहे.

अमेरिकेत विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू