पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही; जयंत पाटलांचा तावडेंना टोला

जयंत पाटील

मागच्या पाच वर्षांत शिक्षणाचा जो विनोद झाला आहे. तो आमच्या सरकारमध्ये होऊ देणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगावला आहे. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान दिले जाईल असे त्यांनी सांगितले. तसंच, सध्याच्या परिस्थितीत आशिषचं समाधान आम्ही करु शकत नाही. मात्र ज्यांच्याकडे आशिष नाही त्यांच्याकडे आशिष पाठवण्याची व्यवस्था आम्ही नक्की करु, असा टोला त्यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे. 

मी बंड केलं नाही, तर भूमिका मांडली: अजित पवार

शपथविधी सोहळ्यापूर्वी महाआघाडीच्या नेत्यांची किमान-समान कार्यक्रमावर पत्रकार परिषद झाली. यावेळी जयंत पाटील यांनी विनोद तावडे आणि आशिष शेलार यांच्यावर टीका केली. दरम्यान, मागच्या सरकारने मेट्रोसाठी वृक्षतोड केली त्याला आम्ही विरोध केला. मात्र आता मुंबईकरांच्या विरोधात जाऊन आम्ही काम करणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

'उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार निर्णय घेतील'

दरम्यान, आधी शपथ घेऊ द्या, मग सर्व आश्वासनं पूर्ण करु, असे जयंत पाटील यांनी सांगितले. आम्ही किमान समान कार्यक्रम घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत. शपथ घ्यायला तुमची परवानगी द्या, असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

महाराष्ट्रात मोदी-शहांचा डाव अपयशी ठरला: सोनिया गांधी