पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरकुल घोटाळाः माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन

सुरेश जैन

जळगावमधील घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री सुरेश जैन मुंबइ उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जैन यांना वैद्यकीय कारणांसाठी तीन महिन्यांचा हंगामी जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५ लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे.

इतक्या वर्षांत साहेब पहिल्यांदाच चिडलेः सुप्रिया सुळे

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने शिवसेना नेते आणि सुरेश जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना दोषी जाहीर केले होते. सुरेश जैन यांना ७ वर्षांच्या शिक्षेसह १०० कोटींचा दंड ठोठावला. याच प्रकरणात गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत, खडसेंचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

कारागृहात असलेले सुरेश जैन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली आहे. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. जे जे रुग्णालयातील कारागृह वॉर्डमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते. उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला.