पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई सेंट्रल येथे जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग

ब्रेकिंग न्यूज

जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल येथील यार्डामध्ये उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेसला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील रेल्वे दुरुस्ती यार्डामध्ये जयपूर एक्स्प्रेस उभी होती. उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या एसी ३ टायर डब्यातून अचानक आग लागल्याचे दिसून आले. संध्याकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीचे नेमके कारण समजले नसून रेल्वे पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे जयपूर एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  

'ॐ'  आणि 'गाय' या शब्दांमुळे काहींना कापरे भरते : PM मोदी