पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जैन तरुणांनी व्यवसायापेक्षा सरकारी नोकरीकडे वळावे'

सरकारी कर्मचारी

जैन समाजातील तरुणांनी सरकारी नोकरीकडे वळले पाहिजे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत समाजातील धार्मिक नेत्यांनी केले आहे. देशात जैन समाज एकूण लोकसंख्येच्या ०.४ टक्के इतकाच आहे. हा समाज पारंपरिकपणे व्यवसाय करणाऱ्याला प्राधान्य देतो.

'बाळासाहेब ठाकरेंना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो'

रविवारी जैन समाजातील लोकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना श्री प्रसानकिर्तीसागर सुरीसवरजी महाराज म्हणाले, सध्या समाजातील केवळ ०.१ टक्के लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत. ब्रेन ड्रेनचा मुद्दा आपल्या समाजातही आहे. त्यामुळे अनेक जण बहुराष्ट्रीय खासगी कंपन्यांमध्ये काम करण्याला प्राधान्य देतात. याचा देशाला केवळ आर्थिक फायदा होतो. जैन समाजातील खूप कमी तरूण स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतात. 

निवृत्त अतिरिक्त सचिव हेमेंद्र शहा म्हणाले, उत्तर प्रदेशात खूप आधीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाते. त्याचवेळी जैन आणि गुजराती समाजातील तरुण-तरुणी यासाठी फारसे उत्सुक नसतात. या नोकऱ्यांबद्दल जनजागृतीची गरज आहे. 

नवा वाद! उच्च शिक्षण मंत्री सामंतही ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी

सरकारी नोकरीमध्ये सुरक्षितता असते. खासगी कंपन्यांमध्ये ती अजिबात नसते. सध्या अनेकांच्या खासगी नोकऱ्या जाताहेत, अशावेळी सरकारी नोकऱ्यांचे महत्त्व पटते, असे सीमा शुल्क विभागाच्या अधीक्षक गीता शहा यांनी म्हटले आहे.