पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सेव्ह मेट्रो सेव्ह मुंबई', CM ठाकरेंच्या निर्णयावर फडणवीसांचा नारा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने आरे कारशेडसंदर्भात घेतलेल्या ठाम निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे, असे ट्विट करत मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून देत फडणवीसांनी 'सेव्ह मेट्रो सेव्ह मुंबई' असा नारा हॅशटॅगच्या माध्यमातून दिला आहे.     

 

CM उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामाला दिली स्थगिती

जपानच्या जायकाने अल्प  व्याजदराने सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. राज्य सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयामुळे भविष्यात पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी परदेशी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत. १५ वर्षांपासून रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी विलंब होईल, अशी चिंता देखील फडणवीसांनी व्यक्त केली आहे. 

महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कारभार हाती घेतल्यानंतर मेट्रोसाठी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. आमचा मेट्रोला आणि विकास कामाला विरोध नाही. यासंदर्भातील संपूर्ण आढाव घेतल्याशिवाय पुढचे काम होणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. यापूर्वी फडणवीस सरकारने रात्रीत आरेतील वृक्षतोड केल्यानं पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी शिवसेनेने सत्तेत आल्यावर आरे संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Its unfortunate that State Government stayed Aarey Metro CarShed work in spite of Hon Supreme Court Hon High Court orders Says devendra fadnavis